पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा- इयत्ता पाचवी
राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाने सन १९५४-५५ या शैक्षणिक वर्षापासून सुरु केली आहे. यातील एक महत्वाचा भाग म्हणजे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा- इयत्ता पाचवी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत होणारी शिष्यवृत्ती परीक्षा हि प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असते. या परीक्षेची तयारी करण्यासाठी आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत. हि सर्व सुविधा विनामुल्य/निशुल्क/ मोफत असणार आहे. आम्हाला फक्त आपल्याकडून दोन बाबींची अपेक्षा आहे.
१) आपण नियमित सर्व सत्रांना उपस्थित राहून अभ्यास करणे.
२) वेळोवेळी होणाऱ्या सराव चाचण्या सोडविणे.
चला तर मग करूया सुरवात !
आपले ऑनलाईन सत्र दिनांक १ सप्टेंबर २०२१ पासून सुरु होणार आहे. आपल्याला दर पंधरा दिवसाच्या वर्गांचे वेळापत्रक, ऑनलाईन सत्राची लिंक, महत्वाचे लेख, मागील सत्रांचे व्हिडिओ, सराव प्रश्नसंच याच वेबपेजवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल...