Title of the document
top of page
Math Formulas
अपूर्णांक

Fraction - अपूर्णांक 

अपूर्णांक संबधी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा यात नेहमी प्रश्न विचारले जातात. अपूर्णांक तुलना, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, तुलना इ . बाबी यांच्या संबधी माहिती असणे आवश्यक आहे. तत्पूर्वी काही मुलभूत बाबी माहित असणे आवश्यक आहे. 

अपूर्णांक :-

             ज्या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येत नाहीत, त्यास अपूर्णांक संख्या म्हणतात. साधारणपणे ज्या संख्या र/ल या स्वरूपात दर्शविल्या जातात त्यांना अपूर्णांक असे म्हणतात. अपूर्णांक संख्येच्या छेदामध्ये १ नसतो

                अपूर्णांक या घटकावरील प्रश्नोत्तरे सोडवण्याआधी अपूर्णांकाशी संबंधित काही मूलभूत माहिती असणे आवश्यक आ

अपूर्णांक या घटकांमधील काही महत्त्वाच्या उपघटकांची माहिती आपण घेऊया.

  • अंशाधिक अपूर्णांक

  •  छेदाधिक अपूर्णांक

  • पूर्णांक युक्त अपूर्णांक

  • समछेद अपूर्णांक

  • भिन्न छेद अपूर्णांक

  • सममूल्य अपूर्णांक

अपूर्णांकांचे प्रकार :-

या घटकात ​आपण व्यावहारिक अपुर्णाकाची माहिती अभ्यासणार आहोत. दशांश अपूर्णांक या घटकाबद्दल स्वतंत्र माहिती अभ्यासणार आहोत.

अंशाधिक अपूर्णांक:-

        ज्या अपूर्णांकात अंशस्थानांची संख्या ही छेदस्थानाच्या संख्येपेक्षा मोठी असते त्याला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात.

   उदा. ५/३ ; ३/२ ; ११/९

छेदाधिक अपूर्णांक:-  ज्या अपूर्णांकांची ज्या अपूर्णांकात छेदस्थानाची  संख्या या अंशस्थानच्या संख्येपेक्षा मोठी असते त्यांना छेदाधिक अपूर्णांक म्हणतात.    उदा.  ३/७ ; १०/१४ ; ८/१० 

पूर्णांक युक्त अपूर्णांक:-

- पूर्णांक युक्त अपूर्णांक ही संकल्पना  सविस्तपणे समजून घेण्यासाठी क्लिक करा...

- पूर्णांक युक्त अपूर्णांकाला मिश्र अपूर्णांक असे म्हणतात.

- पूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक मिळून पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होतात.

- पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करता येते तसेच अंशाधिक अपूर्णांकाचे सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करता येते.

समछेद अपूर्णांक:- 

   ज्या पूर्णांकांचे छेद समान असतात त्या अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक म्हणतात.

उदा. २/५ ; ४/५ ; १/५ यात सर्व अपूर्णांकांचा छेद ५ असल्यामुळे, या सर्वांना परस्परांचे समच्छेद अपूर्णांक म्हणतात.

भिन्न छेद अपूर्णांक :- 

      ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न असतात त्या अपूर्णांकांना भिन्न छेद अपूर्णांक म्हणतात.

उदा. २/४ ; ४/५ ; १/३ यात सर्व अपूर्णांकांचा छेद भिन्न असल्यामुळे, या सर्वांना परस्परांचे भिन्नच्छेद अपूर्णांक म्हणतात.

 सममूल्य अपूर्णांक :-

दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपूर्णांकांचे संक्षिप्त किंवा सरळ रूपामध्ये मांडणी केल्यानंतर एकच किंमत येत असेल त्यांना सममूल्य पूर्णांक म्हणतात.

 

 सममूल्य अपूर्णांक तयार करणे.

                 विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिले की ; सममूल्य अपूर्णांक कसा शोधायचा. आता आपण सममूल्य अपूर्णांक तयार कसा करायचा याचा अभ्यास करू. सममूल्य अपूर्णांक तयार करण्यासाठी अपुर्णकाच्या अंशाला व छेदाला एकाच संख्येने गुणावे किंवा भागावे लागते. हे समजून घेण्यासाठी आपण पुढील उदाहरणांचा वापर करू.

 १) 1/2 = 1/2 × 2/2 = 2/4

     (1 छेद 2 हा मूळ अपूर्णांक आहे त्याला आपण 2 ने गुणले असता 2/4 अपूर्णांक मिळतो.)

२) 1/2 = 1/2 × 3/3 = 3/6

    (1/2 या मूळ अपूर्णांकास 3 ने गुणले असता 3/6 हा अपूर्णांक मिळतो.)

३) 4/8 = 4÷4 / 8÷4 = 1/2

   (4/8 या अपूर्णांकास 4 ने भागले असता आपणास मूळ अपूर्णांक म्हणजेच 1/2 मिळतो.)

 

 आता ३/५ या अपूर्णांकाशी सममूल्य असणारे तीन अपूर्णांक शोधू .

१) 3/5 × 2/2 = 6/10

(3/5 या अपूर्णांकास 2 या अंकाने गुणले असता 6/10 हा अपूर्णांक मिळतो.)

२) 3/5 × 3/3 = 9/15

(3/5 या अपूर्णांकास 3 या अंकाने गुणले असता 9/15 हा अपूर्णांक मिळतो.)

३) 3/5 × 4/4 = 12/20

 (3/5 या अपूर्णांकास ४ या अंकाने गुणले असता 12/20 हा अपूर्णांक मिळतो.)

यावरून 3/5 या अपूर्णांकाचे 6/10 ,9/15 , 12/20 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. आपण पाहिले की गुणाकार करून सममूल्य अपूर्णांक काढता येतो. त्याचप्रमाणे भागाकार करूनही आपल्याला सममूल्य अपूर्णांक काढता येतो.

 गुणाकार व्यस्त अपूर्णांक :-

 -जेव्हा दिलेल्या दोन अपूर्णांकांचा गुणाकार एक येतो त्यावेळेस त्या दोन संख्यांना एकमेकांचे परस्परांचे गुणाकार व्यस्त असे म्हणतात.

उदा. ६/७ व ७/६ यांचा गुणाकार १ येईल. या दोन्ही संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. 

- गुणाकार व्यस्त संख्या करत असताना दिलेल्या अपूर्णांक संख्येचा अंश छेद स्थानी जातो तर छेद हा अंशस्थानी येतो यातून आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या मिळते.

- अपूर्णांकांचा गुणाकार करत असताना अंशांचा अंशांसोबत गुणाकार करावा छेदांचा छेदासोबत गुणाकार करावा.

अपूर्णांकांची मुलभूत क्रिया :- 

 

 बेरीज व वजाबाकी:- 

  १) समछेद अपूर्णांक (छेद समान असल्यावर):-

 छेद समान असणाऱ्या दोन अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना त्यांच्या अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करावी व छेद तसाच ठेवावा.

 २)  भिन्न छेद अपूर्णांक (छेद समान नसल्यावर ):-

 छेद समान नसणाऱ्या दोन अपूर्णांकांची बेरीज करताना त्या दोन अपूर्णांकांचे छेद समान करून घ्यावे व त्यानंतर त्यांची बेरीज व वजाबाकी करावी.

 उदा. २/३ + ३/५ = 

        या उदाहरणात दोघांचे छेद तीन व पाच आहे.

        दोघांचे छेद समान करण्यासाठी त्यांचा लसावी शोधावा लागेल.म्हणजेच दोघांच्या पटीत येणारे जवळची  संख्या शोधावी लागेल.

           तीन व पाच यांच्या पटीतील जवळची संख्या सामायिक संख्या ही १५ आहे. म्हणून दोघांचा छेद १५ करावा लागेल.

          यासाठी   २/३  या संख्येला ५/५ ने गुणावे लागेल.  तर ३/५ ला ३/३  ने गुणावे लागेल.  तेव्हा दोघांचे छेद सारखे होतील व  सममूल्य 

         अपूर्णांक मिळून आपल्या मूळ अपूर्णांकांची किंमत बदलणार नाही यासाठी सममूल्य अपूर्णांक ही संकल्पना समजणे आवश्यक आहे.

  

     गुणाकार:- 

- अपूर्णांकांचा गुणाकार करत असताना अंशांचा अंशांसोबत गुणाकार करावा छेदांचा छेदासोबत गुणाकार करावा.

उदा. ३/७ गुणिले ४/५ =  ३ गुणिले ४ / ७ गुणिले ५ = १२/३५ 

 

अपूर्णांकांची तुलना:-

 

            १) जेव्हा एक छेद समान असल्यास दिलेल्या व्यवहारीक अपूर्णांकाचे छेद जेव्हा समान असतात परंतु अंश भिन्न असतात तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो.

 उदा.  ४/९ व ८/९ यात ८/९ अपूर्णांक मोठा येतो.

             २)  अंश समान असल्यावर जेव्हा दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकाचे अंश समान असतात परंतु छेद भिन्न असतात तेव्हा ज्या अपूर्णांकांचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो.

 उदा. ५/७ व ५/१२ यात ५/७ अपूर्णांक मोठा येतो.

            ३) जेव्हा अपूर्णांकांचा छेद व अंश दोन्हीही भिन्न असतात तेव्हा लहान मोठेपणा ठरवताना दोन्ही अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांकात करून छेद समान करण्याची प्रक्रिया करावी व ज्यांचा छेद जेव्हा छेद समान होतील व अंशांमध्ये जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा येईल.

            ४)  जेव्हा दिलेला अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 1 ने (किंवा 2-3 ने) मोठा असतो तेव्हा त्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा असतो व तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो.

         उदा. ११/१२; १२/१३; १३/१४  यापैकी १३/१४ हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे.

            ५) या उलट जेव्हा अंश छेदापेक्षा लहान असतो अंश छेदापेक्षा 1 ने (किंवा 2-3 ने) मोठा असतो तेव्हा त्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो

उदा. १२/११; १३/१२; १४/१३  यापैकी १२/११ हा अपूर्णांक सर्वात मोठा असतो.          ६)  एखादा दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक हा मूळ अपूर्णांक पेक्षा मोठा असतो

अपूर्णांकांवर आधारित प्रश्न :- 

- एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी ३/५ मुले आहेत आणि ८०० मुली आहेत त्या मुलांची संख्या किती  आहे?  (JNV -2021)

- या उदाहरणात एकूण विद्यार्थ्यांचे आपण पाच समान गटात विभाजन केलेले दिसतात. त्यापैकी तीन छेद पाच हे मुले आहेत तर दोन छेद पाच या मुली आहेत.

 जर दोन छेद पाच मुली असेल व  त्यांची संख्या 800 आहे.

 म्हणजे यात एकक अपूर्णांक एक छेद पाच =  400 एवढे येतील

 तर 400 x 3  = 1200  मुले येतात

 

-  एका खोक्यात ५०० अंडी आहेत. त्यापैकी ३/२५  फुटली. उरलेल्यांपैकी ४/५ अंडी विकली तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती?  (JNV-२०१९)

- एक भांडे पाण्याने १/२५ भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी ४० लिटर पाणी लागत आहे तर भांड्याची क्षमता किती? (JNV-२०१४) 

- एक सामना एकूण अर्धा तास चालतो. सामन्याच्या वेळेचा १/१० काळ टाईमआऊट साठी देण्यात येतो. तर टाईम आऊट किती मिनिटाचा आहे (JNV-२०२१)

bottom of page