Title of the document
top of page

गणित - एक दृष्टिकोन -

आपण एखाद्या शाळेत गेलो, तिथे गणिताच्या तासिकेत पुढील बदल होतांना दिसत आहेत.
 
            गणित विषयातील कृती करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना उत्सुकता असेल. गणितमित्र शिक्षक विद्यार्थ्यामध्ये बसलेले असतील. प्रत्येक विद्यार्थी गणिताच्या प्रत्येक उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवताना दिसतील. विद्यार्थी स्वतः साहित्य हाताळतांना दिसत आहेत.सर्व विद्यार्थी गटात गणितपेटीतील साहित्याच्या सहाय्याने प्रत्येक कृती करून संबोध समजून घेतांना दिसतील. गटात मुले एकमेकांना मूळ संख्या,त्रिकोणी संख्या,चौरस संख्या यासारखे घटक साहित्याने समजावून सांगतांना दिसतील.विद्यार्थी एकाच प्रकारचे उदाहरणे स्वतः सोडवून त्यावर आधारित नियम स्वतः तयार करतील. दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे विद्यार्थी स्वतः तयार करतांना दिसतील.
              सर्व मुले तर्कनिष्ठ विचार करून व्यक्त होतांना दिसतील. वर्गात कुठे समूहात तर कुठे  एकटे. आपापसात चर्चा करत, समस्यांचे निर्करण करीत गणितीय कोडी, खेळ सोडविण्यात मग्न असलेली दिसतात. साहित्याचा वापर झाल्यावर पुन्हा गणित कोपऱ्यात व्यवस्थित ठेवतात. विद्यार्थी गणिताच्या गोष्टी सांगताना दिसतील. जे विद्यार्थी गणित विषयात प्रज्ञावंत आहेत,  त्यांची स्पर्धा परीक्षेसाठी तयारी सुरु असणार. इतर मुलाकरिता शिक्षक वैयक्तिक समुपदेशन करतांना दिसत आहेत.प्रगतीशील विद्यार्थ्यासाठी परिसरातील वस्तूंच्या आधारे प्रमाणित शैक्षणिक अध्ययन साहित्य तयार करण्यात शिक्षक दंग असतील.
             गणितजत्रा, गणित  साहित्य प्रदर्शन, बाजारपेठ , बँक या सारखे प्रत्यक्ष कार्यक्रम विद्यार्थी संचालित करतांना दिसतील. विद्यार्थी एकमेकांचे गणितमित्र बनून एकमेकांना गणितातील अभिरुची,आवड, निर्माण करण्यास मदत करतांना दिसतील. साहित्याचा वापर करून संबोध समजल्यावर साहित्यविना विद्यार्थी विविध उदाहरणे सोडवितांना दिसतील. एका फलकावर शिक्षकांनी लिहिलेली  गणितावर आधारित खेळ, व कोडी सोडविण्यात विद्यार्थी मग्न आहेत. काही विद्यार्थी गणिततज्ञाची गोष्टी वाचतांना दिसतात.

bottom of page