Title of the document
top of page

गणित विषयासारखा सोपा विषय कोणताच नाही

              गणित विषयासारखा सोपा विषय कोणताच नाही - असे ज्या विद्यार्थ्याला /व्यक्तींना  वाटते, त्यांचा गणित विषय हा आवडीचा आहे असे समजण्यात काहीच चुकीचे नाही. मुलं शाळेत येण्याआधीच गणित विषय आत्मसात करत असतो. प्राथमिक स्तरावर गणितातील मूलभूत क्षेत्राकडे पाहता मुलं परिसरात सर्व क्षेत्रांचे पूर्वज्ञान सहज मिळवतात व आत्मसात करतात. गणिताची प्राथमिक स्तरावरील 7 मुलभूत क्षेत्र पाहुयात.
              
१) संख्याज्ञान
              २) संख्यावरील क्रिया
              ३) भूमिती
              ४) मापन
              ५) अपूर्णांक
              ६) माहितीचे व्यवस्थापन
              ७) आकृतिबंध

         

            मग शालेय जीवनात पदार्पण केल्यावर हाच गणित अवघड का वाटतो. याकरिता आपण पुढील काही दिवस या सर्व क्षेत्राबाबत चर्चा व माहिती पाहूया. मुलांना या क्षेत्रांची ओढ कशी लावावी याबाबत आपण माहिती घेणार..

 

         Students don't need a perfect teacher.  They need a teacher who gets them excited about learning. A teacher who smiles and makes them enjoy coming to school. Each and every day.
           

           म्हणजेच विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षकांची आवश्यकता नाही. त्यांना अशा एका शिक्षकाची आवश्यकता आहे, जो त्यांना शिकण्याबद्दल उत्साहित करतो. असा शिक्षक जो, हसतो आणि त्यांना शाळेत आल्यावर आनंद देतो.  प्रत्येक दिवस.

 

           चला तर मग गणित सोपे करूया...

           आपण सर्व मिळून, गणित अवघड वाटणाऱ्यांना  गणिताचा मार्ग सुलभ करून देऊया....

Writer

गणितमित्र- वैभव शिंदे

 - मो.नं. - ९५५२७७४३८५

- vsshinde3569@gmail.com

bottom of page